जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार आहे. आता ही गाडी नांदेड- मुंबई एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल. साहजिकजच गाडीच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी सव्वाआठ वाजता मुंबईच्या दिशेने निघेल.
केंद्रीय रेल्वे बोर्डाने याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. त्यानुसार मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. वंदे भारत नांदेड – मुंबई गाडी क्रमांक २०७०५ बुधवार वगळता दररोज सकाळी पाच वाजता नांदेड येऊन सुटेल.
स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
परभणी – पहाटे ५.४० वाजता/ पहाटे ५.४२ वाजता
जालना – सकाळी ७.२० वाजता / सकाळी ७.२२ वाजता
छत्रपती संभाजीनगर- सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता
अंकाई – सकाळी ९.४० वाजता
मनमाड – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता
नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता
कल्याण -दुपारी १ वाजून २० मिनिटे/ दुपारी १.२२ वाजता
ठाणे – दुपारी १.४०वाजता/ दुपारी १.४२ वाजता
दादर – दुपारी २.१० वाजता / दुपारी २.१० वाजता
आणि सीएसएमटी येथे दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी पोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २०७०६ गुरुवार वगळता दररोज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघेल.
स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता
ठाणे -दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
कल्याण – दुपारी २.४ वाजता / दुपारी २.०६ वाजता
नाशिक रोड – दुपारी ४.१८वाजता / दुपारी ४.२०
मनमाड – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता
अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता / सायंकाळी ५.५२ वाजता
छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता
जालना – रात्री ८.०५ वाजता / ५.०७ वाजता
परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता
नांदेड येथे रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. रेल्वेत आठ एसी सेकंड क्लास सीटर कोच उपलब्ध रहणार आहेत.