पुण्यात बिबट्याच्या हल्ल्याचा थरार

मुळशी तालुक्यातील भूगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवासी राजेंद्र शेंडे यांच्या फार्म हाऊसमध्ये बिबट्याने घुसून एक शेळी ओढून नेल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

भूगाव आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्या चे दर्शन वारंवार होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी बिबट्या घरांच्या आसपास फिरत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांना आपल्या जनावरांचे नुकसान होण्याची भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *