मोदी दिवसातून 16 वेळा बदलतात कपडे – राहुल

“पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी भारताबाहेर जातात त्यावेळी ते सोळावेळा कपडे बदलतात. तुम्ही कधी नितीश कुमार यांना सूटामध्ये पाहिले आहे का?‘, असे म्हणत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

बिहार विधानसभेच्या प्रचारसभेत गांधी बोलत होते. ते म्हणाले, “मोदी सामान्य माणसाला 15 लाख रुपये देऊ शकत नाहीत. मात्र ते त्यांच्या उद्योजक मित्रांना कोट्यवधी रुपये देत आहेत‘ तसेच “ते फेसबुक, ट्‌विटरवर आहेत. पण शेतकऱ्यांना भेटत नाहीत. ते म्हणाले होते की ते शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देऊ. आज देशभरातील शेतकरी आत्महत्या करत नसून आणि त्याची ते दखलही घेत नाहीत‘ असेही राहुल पुढे म्हणाले. नितीश कुमार यांनी राज्यातील जनतेचा सन्मान करत विकासाचा मार्गावरून जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *