मी कोणत्याही गोळ्या घेतल्या नव्हत्या किंबहुना मी कोणत्याही प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही.” असा खुलासा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात इंद्राणीनं हा खुलासा केला आहे.
आत्महत्येसाठी मी कोँणतही औषध घेतलं नसल्याचं इंद्राणीनं पोलिसांना सांगितलं आहे. तसेच आपल्याला वयाच्या 13व्या वर्षी अशाच प्रकारचा त्रास झाला होता. तेव्हा देखील मी अशाच प्रकारे चक्कर येऊन पडली होती. असंही तिने आपल्या जबाबात म्हटले आहे.
इंद्राणीनं स्वतः लिहिलेल्या दीड पानांच्या जबाबात या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जीची प्रकृती ठीक असल्याने आज तिला जे. जे. रुग्णालयातून सोडण्यात आलं. इंद्राणीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅब आणि हिंदुजा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र दोन्ही ठिकाणाहून दोन वेगळे अहवाल आले होते.
