वीकेंडला लोकलचा खोळंबा! तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, बघा वेळापत्रक

रविवारी (07 जून) ला मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी त्याचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे. त्यामुळं प्रवाशांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर कुठे असणार मेगा ब्लॉक?

विद्याविहार आणि ठाणे या स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत 5 व्या आणि 6 व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम एक्स्प्रेस गाड्यांवरही होणार आहे. काही मेल/एक्स्प्रेस अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वेवर कुठे असणार मेगा ब्लॉक?

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 4.5 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल-सीएसएमटीदरम्यानच्या सेवा रद्द केल्या आहेत.

ट्रान्स हार्बर रेल्वेवर कुठे असणार मेगा ब्लॉक?

पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.2 ते दुपारी 3.53 पर्यंत आणि ठाण्यातून पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 पर्यंत बंद राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर कुठे असणार मेगा ब्लॉक?

पश्चिम रेल्वे मार्गावर सलग 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्रीचा असणार आहे. मीरा रोड आणि भाईदरदरम्यान मेट्रो-9 च्या गर्डर लॉन्चिंगसाठी तिन्ही दिवस मध्यरात्री 12:45 ते 3:15 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल. शनिवारी शेवटच्या दोन चर्चगेट-विरार गाड्या रद्द होतील. रविवारी सकाळी 10:35 ते 3:35 या वेळेत चर्चगेट- मुंबई सेंट्रलदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *