मुंबई अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?; महानगरपालिकेचा सत्तेचा मार्ग मोकळा भाजपची रणनिती

लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं कंबर कसली असून मुंबईत भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतलाय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला आता नवीन अध्यक्ष मिळणार आहे. मुंबई अध्यक्षपदाच्या रेसमध्ये भाजपाच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांची नावं सध्या आघाडीवर आहे.

आगामी मंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भाजपनं महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास सुरुवात केलीय. मुंबई महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून एकहाती सत्ता काढून घेण्यातही भाजपचे नेते मैदानात उतरलेत. महानगरपालिकेचा सत्तेचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजप लवकरच नवीन अध्यक्ष नेमणार आहे. सध्या मंत्री आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांच्याजागी आता नवीन नेत्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे. या रेसमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांची नावं आघाडीवर आहे.

मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम आणि माजी आमदार सुनील राणे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र ही नावे समोर येत असताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यांना संधी दिली जाणार की सध्याचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर पालिका निवडणूक होईपर्यंत धुरा सोपवली जाणार ? अशी चर्चा आता भाजपच्या गोटातून सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता मिळवण्यासाठी आशिष शेलार यांच्यासारखा हुकुमी एक्क्यावर मुंबईची धुरा सोपवावी असा एक सूर भाजपच्या गोटातून आहे, तर दुसरीकडे मुंबईत ताकद असलेला ठाकरेंना अंगावर घेणारा अध्यक्ष निवडावा असाही मतप्रवाह दुसऱ्या गटाचा आहे. त्यामुळे राज्याचा प्रदेश अध्यक्ष तर ठरला मात्र मुंबई अध्यक्ष कधी ठरणार हे पाहण महत्वाचे असेल.

मुंबई महानगर पाहिला ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे, 2017 साली जे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही ते स्वप्न साकारण्याची भाजप आता पूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे. नवा मुंबई अध्यक्ष नेमल्यानंतरच भाजपची निवडणुकीसाठीची पहिली रणनीती समोर येईल, त्यामुळे भाजप मुंबईचा शिलेदार कोणाला बनवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *