महिला खासदाराने संसदेत दाखवला स्वत:चा न्यूड फोटो, धक्कादायक प्रकार ऐकून सारेच हादरले!

न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅक्ल्योर यांनी सोमवारी देशाच्या संसदेत एक धक्कादायक पाऊल उचलले. त्यांनी स्वतःचा एआय-जनरेटेड नग्न फोटो दाखवून डीपफेक तंत्रज्ञानाच्या धोक्यांकडे लक्ष वेधले. तरुणांवर विशेषतः किशोरवयीन मुलांवर डिजिटल गैरवापराचा वाढता धोका अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.

खासदार स्वतः डीपफेकची शिकार

हा न्यूड फोटो मी घरीच साध्या कॉम्प्युटरवर ओपन-अ‍ॅक्सेस टूल्सच्या मदतीने काही मिनिटांत तयार केला. हे तंत्रज्ञान एखाद्याची प्रतिमा किती प्रमाणात खराब करण्यास सक्षम आहे आणि ते किती सोपं झालं हे दाखवण्याचा आपला उद्देश असल्याचे संसदेत बोलताना मॅक्ल्योर यांनी सांगितले.

संसदेतील भाषणानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. आणि त्यावर कॅप्शन लिहिले. ‘मी हे उदाहरण संसदेत सादर केले जेणेकरून सर्व खासदारांना हे तंत्रज्ञान किती धोकादायक आहे समजेल. आपले तरुण, विशेषतः तरुणी त्याचे बळी कसे बनतायत हे समाजासमोर येईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

एआयद्वारे असे होते चारित्र्यहनन

डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे महिलांच्या प्रतिमांमध्ये फेरफार करून अश्लील कंटेट तयार करणे हा एक गंभीर सामाजिक धोका बनत चाललाय. याबद्दल खासदारांनी चिंता व्यक्त केली. अशा डिजिटल गुन्ह्यांवर कठोर कायदे केले पाहिजेत आणि तांत्रिक देखरेख मजबूत केली पाहिजे, अशी मागणी मॅक्ल्योर यांनी सरकारकडे केली.

डीपफेकविरुद्ध कायद्याची मागणी

लॉरा ज्या विधेयकाचे समर्थन करतायत त्याचे नाव ‘डीपफेक डिजिटल हार्म अँड एक्सप्लॉयटेशन बिल’ असे आहे. या प्रस्तावित कायद्याचा उद्देश रिव्हेंज पॉर्न, संमतीशिवाय रेकॉर्डिंग आणि डीपफेक कंटेंटला गुन्ह्याच्या श्रेणीत आणणे हा आहे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यासोबतच, पीडितांना दिलासा देण्याची आणि चुकीची सामग्री काढून टाकण्याची तरतूद देखील या कायद्यात असेल.

कायदे यासाठी तयार नाहीत – लॉरा

खासदार लॉरा या विषयावर सोशल मीडियावरदेखील व्यक्त झाल्यायत. कोणीही डीपफेकचे लक्ष्य बनू नये. आमचे कायदे यासाठी तयार नाहीत आणि ही गोष्ट बदलली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. या विषयावर जागरूकता वाढून ही प्रकरणे सरकारने गांभीर्याने घ्यावीत अशी त्यांची इच्छा आहे.

एआय आणि डीपफेक हे नवीन आव्हान

आजकाल सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर झपाट्याने वाढलाय. हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय की खरे आणि बनावट यात फरक करणे कठीण होत चाललंय. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेचे बनावट नग्न किंवा आक्षेपार्ह चित्र बनवले आणि ते व्हायरल केले तर त्याचे सामाजिक आणि मानसिक परिणाम खूप गंभीर असू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

लॉरा मॅकल्युर यांचा हा उपक्रम तंत्रज्ञानाचा गैरवापर समाज आणि व्यक्तीसाठी कसा घातक ठरू शकतो हे दाखवून देतो. त्यांचे धाडसी पाऊल निश्चितच डिजिटल गुन्ह्यांविरुद्ध एक मोठा संदेश देतंय. भविष्यात या दिशेने मजबूत कायद्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *