5 वर्षांच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार, आरोपी विक्षिप्त असल्याचे सांगत पोलिसांनी…

आग्रातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नराधमाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने चिमुरडीला फूस लावून घरापासून दूर असलेल्या मंदिरात नेले आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केले. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या कुटुंबीय घटनास्थळी आले तेव्हा आरोपी तिथून पसार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पोलिसांनी युवकाला मानसिक रुग्ण म्हणून सोडून दिले होते. मात्र जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तर एकीकडे या घटनेने मुलीला मोठा धक्का बसला आहे. ही घटना 18 मे रोजीची आहे. पाच वर्षांची चिमुकली मंदिराच्या परिसरात खेळत होती. त्याचवेळी त्यांच्या घराशेजारी राहणारा तरुण पवित्र उर्फ पम्मी आला आणि त्याने चिमुकलीला फूस लावून मंदिरात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

या दरम्यान चिमुकलीने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिचे तोंड दाबले. मात्र मुलीच्या आवाजाने तिची आजी मंदिरात पोहोचली. आरोपीने जेव्हा तिच्या आजीचा पाहिले तेव्हा तो तिथून पळून जायला लागला. तिच्या आजीला काही समजण्याआधीच तो तिथून निसटला. चिमुकलीची अवस्था पाहून तिच्या आजीने स्थानिकांना आवाज दिला. तेव्हा त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांकडे सोपवले.

स्थानिक लोकांच्या मते, पोलिसांनी आरोपीला मानसिक रुग्ण असल्याचे म्हणून सोडून दिले होते. मात्र सोमवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ते पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आरोपी युवकाला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले. तसंच, पीडितेच्या कुटुंबांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळाळेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या विक्षिप्त आहे. सध्या या व्हिडिओची तपासणी करण्यात येत आहे. तसंच, पीडितेची वैद्यकीय चाचणीदेखील केली जाणार आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल, असं अश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *