भोंगे वाजणार इतक्यातच… मॉक ड्रीलला तूर्तास स्थगिती; ‘ऑपरेशन शील्ड’ची नवी तारीख लवकरच होणार जाहीर

गुरुवारी (29 मे 2025 रोजी) केंद्र सरकारनं सिविल डिफेंस अभ्यास अंतर्गत घेतलं जाणारं मॉक ड्रील काही प्रशासकिय कारणांनी स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं. सर्व संरक्षण यंत्रणा आणि संबंधित विभागांना यासंदर्भातील कल्पना देण्यात आली असून, सीमावर्ती भागांतील राज्यांमध्ये होणारं हे मॉक ड्रील स्थगित झाल्याच्या सूचना जारी करण्यात आल्या. शिवाय ऑपरेशन शील्डसंद्रभातील नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असंही यंत्रणांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार 29 मे रोजी गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि चंदीगढसह काही केंद्र शासित प्रदेशांमध्येही मॉक ड्रील होणार होती. मात्र आता ती स्थगित करण्यात आली आहे. या निर्णय़ानंतर जम्मू काश्मीरमधील 20 जिल्यांमध्येही मॉक ड्रीलसाठीच्या तयारीला स्थगिती गेण्यात आली. शिवाय राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढसह इतर भागांमध्येही मॉक ड्रील आणि ब्लॅकआऊटचे सराव निर्देश मागे घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *