वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा यांना अटक केली. मात्र मागच्या आठ दिवसांपासून सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. दोघांनाही बावधन पोलिसांनी आज पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली.
दोघांना अटक केल्यानंतर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोघांची प्राथमिक चौकशी केली आहेत. तसेच आरोपी फरार झाल्यानंतर कुठे कुठे गेले? त्यांना मदत कुणी केली? कुठे लपून बसले? याची माहिती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलीस पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांना उत्तरं देतील, असं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांनी अवघ्या ७० सेकंदात पत्रकार परिषद संपवली आहे.