सातारा शहराच्या नजीक असलेल्या उपनगरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाने सातवीत शिकणाऱ्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केला. त्यातून बहीण गर्भवती राहिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. शहर पोलिसांनी भावाला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित मुलगी 13 वर्षांची आहे. काही महिन्यांपासून चुलत भाऊ तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होता. हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुझा भाऊ आणि आई-वडिलांना जीवे ठार मारेन, अशी धमकी तो देत होता. त्यामुळे पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.