हवेतच खेळ खल्लास! भारतीय सैन्याने पाकिस्तानी मिसाईलचे तुकडे तुकडे केले

भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच आहे. भारतीय सैन्याने  पाकिस्तानी मिसाईलचे तुकडे तुकडे केले आहेत. पाकिस्तानचा नापाक प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. पाकचं फतेह मिसाईल भारतीय सैन्याने पाडलं आहे. पाकिस्तानने डागलेली अनेक मिसाईल भारतीय सैन्य हवेतच नष्ट करत आहे.

शनिवारी पहाटे, पाकिस्तानने अमृतसरमधील खासा लष्करी छावणीवर सशस्त्र ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास खासा कॅन्टोन्मेंटवर शत्रूचे अनेक ड्रोन दिसले. भारतीय सैन्याने त्यांना लगेच हे ड्रोन पाडले.

खासा कॅन्टोन्मेंट अमृतसर-अटारी रस्त्यावर आहे. आजूबाजूच्या रहिवाशांना पहाटेच्या अंधारात अनेक मोठे स्फोट ऐकू आले.  पाकिस्तान आपल्या पश्चिम सीमेवर ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रास्त्रांद्वारे भडकावत आहे. आज पहाटे 5 वाजता अमृतसरच्या खासा कॅन्टोन्मेंट परिसरात शत्रूचे अनेक सशस्त्र ड्रोन दिसले. भारतीय हवाई संरक्षण युनिट्सनी तातडीने कारवाई केली आणि हे ड्रोन नष्ट केले.”

दरम्यान, मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर जोरदार प्रतिहल्ला केला. पाकिस्तानातील रावळपिंडी स्फोटांनी हादरल्याची माहिती मिळते. रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतानं जोरदार उत्तर दिलंय. या स्फोटांमुळे पाकिस्तानातील अनेक शहरं हादरलीत. पाकिस्तानकडून काल दिवसभर एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुरापती सुरु होत्या. या कुरापतींना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या चार महत्त्वाच्या एअरबेसवर भारतानं जोरदार प्रतिहल्ले केलेत. नूर खान, रफिकी आणि मुरिद एअरबेस भारतानं लक्ष्य केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *