पुणेकर महिलेकडून झाला मोठा घोळ 50 रुपयांच्या ऐवजी चुकून 50,000 पाठवले, रिक्षाचालक फोनही उचलेना…

हल्ली सर्रास गुगल पेचा वापर केला जातो. डिजीटल पेमेंट असलेले हे प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी सोयीचे तर ठरत आहे. मात्र कधी यामुळं अडचणीदेखील निर्माण होताना दिसतात. तसंच, हल्ली सायबर क्राइमचे जाळे वाढत असताना गुगल पेदेखील लक्ष्य केले जाते. घाईगडबडीत अशा प्लॅटफॉर्मचा वापर केल्यामुळं बँक खात्यातील पैसेदेखील गमावून बसतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका महिलेने रिक्षाचे 50 रुपये भाडे गुगल पेद्वारे देताना चुकून 50 हजार रुपयांची रक्कम पाठवली. मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने रिक्षाचे 50 रुपये भाडे गुगल पे वरून देताना चुकून 50 रुपयांऐवजी 50 हजार रुपये दिले. गडबड झाल्याचे लक्षात येईपर्यंत रिक्षा चालकाने मोबाईल फोन बंद करून ठेवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील महिला तक्रारदाराने प्रवासादरम्यान रिक्षाचालकाला चुकून पन्नास हजार रुपये गुगल पे केल्यानंतर तिने रिक्षा चालकास वेळोवेळी संपर्क केला मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

रिक्षा चालक फोन उचलत नाही हे पाहून तिने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत रिक्षा चालकाला शोधून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तक्रारदार महिलेला पन्नास हजार रुपये परत मिळवून  दिले. त्यामुळं तक्रारदार महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे आभार मानले.

बनावट ई-मेलद्वारे ११ लाख गायब 

बनावट ई-मेलद्वारे कंपनीची 11 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दक्षिण मुंबईतील 31 वर्षीय तक्रारदार यांची आरोग्यविषयक समस्या सोडवणारी कंपनी आहे. 19 एप्रिलला रात्री कंपनीच्या ई-मेल आयडीवरून एका कंपनीच्या आयडीवर 11 लाख रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. 24 तारखेला पैसे पाठवल्यानंतर त्यांनी त्याबाबत कळवले. तेव्हा, त्या कंपनीकडून पैसे मिळाले नसल्याचे त्यांना समजले. ई-मेल तपासताच भामट्याने अधिकृत मेलमध्ये एक अक्षर गायब करून हुबेहूब वाटणाऱ्या बनावट आयडीवरून ई-मेल करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *