ऑपरेशन सिंदूरनंतर IPL 2025 वर हल्ल्याचं संकट, ‘हे’ स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी

7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये  भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं गेलं. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला असून पाकिस्तानकडून नरेंद्र मोदी स्टेडियमला  बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

पाकिस्तानकडून ईमेल द्वारे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी लगेचच सुरक्षेची कारवाई केली असून गुजरात क्रिकेट असोसिएशनने त्यांना ही धमकी मिळाल्यावर लगेचच अहमदाबाद पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. 14 मे  रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. तेव्हा या सामन्याची सुरक्षिततेत कोणतीही कसर केली जाणार नाही आणि यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी याबाबत आश्वस्त केले आहे की खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबत योग्यती सावधगिरी बाळगली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *