दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
२००० साली दाखल झाला होता गुन्हा
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. २००० साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली असता त्यावर न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानुसार आज दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांना अटक केली आहे.