सातवीच्या 8 विद्यार्थ्यांना दुचाकीने उडवलं, अंबरनाथजवळ भीषण अपघात

अंबरनाथजवळ भीषण अपघात झाला आहे. शाळेत जाणाऱ्या 8 मुलांना दुचाकीने उडवलं आहे. यामध्ये सर्वच 8 विद्यार्थी जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अपघातातील सर्वच मुलं सातवीतील विद्यार्थी आहेत.

कल्याण कर्जत महामार्गावरील अंबरनाथजवळच्या मसिहा शाळेसमोर ही दुर्घटना घडली. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या 8 पैकी तीन विद्यार्थी प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबात चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *