मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना कचरा शुल्क लावण्याचे ठरवले असून १०० रुपये ते ७५०० रुपये शुल्क वसूल आकारण्यात येणार आहे. निवासी इमारतींसह हॉटेल, सभागृह, लग्नाचे हॉल, दवाखाने, वसतिगृहे अशा सगळ्याच आस्थापनांना हे शुल्क लावले जाणार आहे. अंतिमत: हे शुल्क सर्व सामान्यांच्या खिशातूनच जाणार हे उघड आहे.
मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि घन कचऱ्याचे वाढते प्रमाण यामुळे मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यात येणार आहे. घराघरातून, कार्यालयातून, इमारतीतून कचरा संकलन करण्याबाबतचे हे शुल्क आहे.
