पदोन्नतीपासून ८०० वैद्याकीय अधिकारी वंचित

आरोग्य विभागात ‘गट ब’मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास ८०० वैद्याकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही. यातील अनेक अधिकारी पदोन्नतीशिवायच निवृत्त झाले असून, आरोग्य विभागातील ‘सनदी अधिकारी’ नेमके काम काय करतात, असा सवाल डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

तब्बल २३ वर्षे आमची सेवाज्येष्ठता यादी करण्यात आली नाही. दोन वर्षांपूर्वी सेवाज्येष्ठता यादी तयार करून आरोग्य सचिवांकडे ही यादी पाठविण्यात आली, तरीही आमची पदोन्नती केली जात नसल्याने आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *