टीव्ही पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशात टीव्ही पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्रकार हेमंत यादव रात्री घरी परतताना बाईकवरुन आलेल्या काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

45 वर्षीय यादव यांच्यावर शनिवारी गोळीबार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तसंच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हेमंत यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर चंदौली पोलिस स्थानकात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिकुरा गावात राहणारे हेमंत यादव हे टीव्ही 24 न्यूज चॅनेलसाठी काम करत होते.

भारतात गेल्या काही महिन्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 4 महिन्यांतली पत्रकाराच्या हत्येची ही तिसरी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *