नासाडीकडे दुर्लक्ष, राखीव साठ्यावर डोळा

 मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेले रस्ते काँक्रीटीकरण, मेट्रो प्रकल्प, पर्जन्यवाहिन्यांची पुनर्बांधणी, विविध ठिकाणी सुरू असलेले रस्ते, पुलांची काम आदी विकासकामांचा थेट फटका मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना बसू लागला आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेले कंत्राटदार आवश्यक खबरदारी घेत नसल्याने दररोज शहरात जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा ३९ टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे राखीव साठ्याची मागणी पालिकेने केली आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्या फुटल्यामुळे लाखो हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणीकपातीलाही तोंड द्यावे लागते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *