हज यात्रेत मृत भारतीयांचा आकडा ५८ वर

हज येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या ५८ झाली असून ७८ जण अद्यापही बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असेही स्वराज यांनी येथे सांगितले.

सौदी अरेबियातील मक्का शहरात हजयात्रेत सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. या प्रथे दरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत एकूण ७६९ जणांचा मृत्यू झाला. तर ९३४ जण जखमी झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *