भिवंडीत दोघांचा नरबळी?

भिवंडीत दोघांचा नरबळी?

शहरातील कोकणी कब्रस्तानात काळ्या जादूसाठी दोघांचे बळी घेतल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

इदगाह येथील इन्तेजामिया तकीया अमानीशाह आणि जामा मशीद ट्रस्टच्या कोकणी कब्रस्तानात रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी लागणारे गांडूळ आणण्यासाठी एक जण गेला असता तेथे त्याला दोघे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.

तेथे लिंबू, सुया, काळी बाहुली, लोखंडी खिळे याबरोबरच डोक्यात दगड मारून आणि चाकूने भोसकलेला मृतदेह होता. त्याच्याशेजारी असलेल्या पिशवीतून आधारकार्ड, पॅनकार्ड सापडले. त्यावरून तो मुंबई-मानखुर्दचा रहिवासी मिनरूल इलाही शेख (२५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यापासून १०० फूट अंतरावर आणखी एक जखमी होता. त्याला तातडीने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

ही घटना शनिवारी रात्री घडली असून, दोघांच्या मृतदेहांशेजारी काळ्या जादूसाठी आणलेले लिंबू, सुया, काळी बाहुली असे साहित्य सापडले.

त्यामुळे हे दोन बळी गेले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *