संतोष देशमुख हत्या प्रकरणः फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV पोलिसांच्या ताब्यात

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या कित्येक दिवसांपासून फरार आहे. कृष्णा आंधळेच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. मात्र जवळपास 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटूनही कृष्णा आंधळेला पकडण्यात यश येत नव्हतं. मात्र नाशिकमध्ये कृष्णा आंधळे असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्थानिकांनीच आंधळेला पाहिलं असल्याचं समोर आलं आहे.

फरार कृष्णा आंधळेला नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरु आहे. एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

स्थानिक लोकांनी दुचाकीवरुन कृष्णा आंधळे दिसल्याचा दिसल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटिव्ही तपासत आहे. या परिसरातील कृष्णा आंदळे किती वाजता आला होता आणि कुठे थांबला होता याची चौकशी पोलिस करत आहेत. तसंच, प्रत्यक्षदर्शींना हाताशी घेऊन पोलिस आंधळेचा शोध घेत आहेत.

कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करणारे प्रत्यक्षदर्शी अॅड गितेश बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘साडेनऊच्या सुमारास मी दत्त मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. त्यातील दोघ जण मास्क घालून उभे होते. त्यातील एकाने मास्क खाली केला तेव्हा मी त्याला एका सेंकदातच ओळखलं की हा कृष्णा आंधळे आहे. त्यांच्याकडे काळ्या रंगाची बाईक होती. त्याने मळलेला व्हाईट शर्ट घातला होता आणि काळ्या रंगाची पँट घातली होती. आमची नजरा नजर झाल्यानंतर तो हळूच बाईकवर बसला आणि मकवानाबादच्या दिशेने पळून गेला. मी फोटो काढायचा आणि त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला. मात्र ते पसार झाले. मी 9.42 वाजता पोलिसांना फोन केला. ते लगेच घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.’

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या वर्णनाची मोटारसाइकल आणि व्यक्ती आहेत का त्यानुसार शोध घेत आहेत. गंगापूर पोलिसांनी तीन पथके शोधासाठी रवाना झाली आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून आंधळेंचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *