राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाभधारक महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली होती. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडला आहे. त्यातही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचा आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न होताच 1500 रुपये महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला. त्यात नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव येथील एका महिलेच्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये जमा झाले. यामुळे महिलेचा संताप अनावर झाला आहे.
लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्य सरकारने महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर 2100 रुपये देण्याचा निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं होतं. परंतु, आता सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आहेत. अशातच नाशिकच्या पारेगावमधील महिलेच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झाल्याने या महिलेने संताप व्यक्त केला आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून माझ्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर सरकारने 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने 1500 रुपये दिले. पण माझ्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलेने संताप व्यक्त केला आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्यात
लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3 हजार ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्यात देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरु राहणार असून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण 3 हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी काळजी करू नये असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
