पुढच्या 5 वर्षांनंतर रस्त्यांवर पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत सीएनजी, इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसतील, असं सांगितलं जातं. त्यामुळे नव्या गाड्या घेणारे आतापासून सीएनजी किंवा इलेक्ट्रीक गाडीचा पर्याय अवलंबतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. बाईक उत्पादक कंपनी यामाहा इंडियाने देशातील पहिली हायब्रिड बाईक लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेली ही देशातील पहिली हायब्रिड मोटरसायकल असल्याचा दावा यामाहा कंपनीकडून करण्यात आलाय. कंपनीने 2025 ची ‘FZ-S Fi हायब्रिड’ बाइक लॉंच केली आहे. ही बाईक 1.44 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीसह दिल्लीत लाँच करण्यात आली आहे. यााधी बजाजने देशातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली होती. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय. सरकार इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात हायड्रोजन वायू, इथेनॉल आणि सीएनजीवर अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
2025 ‘एफझेड-एस फाय हायब्रिड’चे डिझाइन
FZ-S Fi हायब्रिडच्या डिझाइनबद्दल जाणून घेऊया. या बाईकची रचना जुन्या बाईकसारखीच आहे. बाईकच्या टँक कव्हरला तीक्ष्ण कडा आहेत. ज्यामुळे ती लूकच्या बाबतीत साऱ्यांनाच मागे टाकते. बाईकचा सिग्नेचर प्रेझेन्स छान आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये फ्रंट टर्न सिग्नल, एअर इनटेक एरियाचा समावेश आहे.
