मूर्तीसाठी शाडू माती आणि जागा हवी तर १५ मार्चपर्यंत अर्ज करा, ठाणे महापालिकेचे मूर्तीकारांना आवाहन

पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शाडू माती आणि जागेसाठी अर्ज करण्यासाठी पालिकेने मूर्तीकारांना १५ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे मूर्तीसाठी शाडू माती आणि जागा हवी तर १५ मार्चपर्यंत अर्ज करा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

पर्यावरण पूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तीकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची १६ जानेवारी रोजी बैठक घेतली. या बैठकीत मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसेच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले होते. तसेच, पालिकेने ३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण पूरक गणेशोत्सव नियमावली २०२५ ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार, पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत, शाडूच्या मातीसाठी १० मूर्तीकारांनी तर, जागेसाठी ०५ मूर्तीकारांनी अर्ज केला आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी, मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मागणी १५ मार्चपर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी. तसेच, जागेसाठीही अर्ज करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *