राज्यात २०१४-१५ ते २०२३-२४ या दहा वर्षांच्या कालावधीत वीजवापरात ४३.६ टक्के वाढ झाली असून वीजनिर्मितीत ३८.५ टक्के वाढ झाली आहे, तर अपारंपरिक वीजनिर्मितीत ८३.९ टक्के वाढ झाली आहे.
वीजहानीत वाढ
राज्यात २०२३-२४ मध्ये महापारेषणची वीजहानी ३.२७ टक्के होती, तर २०२४-२५ मध्ये त्यात किंचित वाढ होऊन ती ३.३७ टक्के झाली. मात्र याच कालावधीत महावितरणच्या तांत्रिक व व्यावसायिक वीजहानीत १५.८ टक्क्यांवरून १९.३ टक्के अशी साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.
● राज्यातील वीजवापर (२०१४-१५ मध्ये) : १,१२,८५५ दशलक्ष युनिट
● सध्याचा वीजवापर : १,६२,०५४ दशलक्ष युनिट
● वीजनिर्मिती : (२०१४-१५ मध्ये) : १,०३,७७९ दशलक्ष युनिट
● सध्याची वीजनिर्मिती : १,४३,७४६ दशलक्ष युनिट
● अपारंपरिक विजेची स्थापित क्षमता : (२०१४-१५ मध्ये) : ६,७१७ मेगावॉट