समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर (नोएडा) जिल्ह्यातील कलवर्धा गावातील 30 वर्षीय सलमान खान नेक मोहम्मद खान याने पत्नी 28 वर्षीय हसीनबानो सलमान खान हिची हत्या केल्याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान हा पत्नी आणि तीन लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होता. समृद्धी महामार्गावर पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार केल्याचा आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली असल्याचं आरोपी पतीने सांगितलं आहे. घटनेनंतर आरोपी पत्नीचा मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास समृद्धी महामार्गावर फिरत राहिला.
अखेर पहाटेच्या सुमारास तो स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. या हत्येमागील नेमकं कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का? याचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत.
मायलेकाला अश्रू अनावर
‘मानसिक आजारामुळे आईने घर सोडले. शोध घेऊनही न सापडल्याने शेवटी ‘आई आता जिवंत नसावी’, असे मानून आम्ही आयुष्य पुढे नेले. आज अडीच वर्षांनंतर आईला जिवंत पाहणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे’, अशी भावना व्यक्त करत आईला मिठी मारताना मुलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि उपस्थितांचेही डोळे पाणावले.
४२ वर्षीय लक्ष्मी (नाव बदललेले) यांना ११ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी शोधून काढल्यानंतर न्यायिक प्रथम वर्ग दंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या आदेशानुसार नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्या मानसिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याची जबाबदारी स्त्री विभागाच्या समाजसेवा अधीक्षक कुंदा काटेखाये (बिडकर) यांनी स्वीकारली.
