फक्त औरंगजेबची कबरच नाही तर त्याच्या बायकोसाठी बाधंलेला ताजमहल देखील महाराष्ट्रातच; कुणी आणि का बांधल्या या वास्तू?

छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द रुपाने रूपेरी पडद्यावर दाखवणारा छावा चित्रपट फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरात धुमाकूळ घालत आहे.  स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा, धैर्य, पराक्रम,  धर्माभिमान, व्यासंगी असलेल्या संभाजी महाराजांची शौर्यगाथा या चित्रपटात पहायला मिळत आहे. शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब देखील चर्चेत आला आहे.  दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये आहे. फक्त औरंगजेबची कबरच नाही तर त्याच्या बायकोसाठी बाधंलेला ताजमहल देखील संभाजीनगरमध्ये आहे. कुणी आणि का बांधल्या या वास्तू? जाणून घेऊया.

औरंगजेबची कबर

मराठा साम्राज्य जिंकू अशा अविर्भावात औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्रात आला.  14 कोटींचा खजिना, 4 लाख सैन अशी मोठी फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला. दौलताबादचे नाव बदलून त्याने औरंगाबाद असे केले. मात्र, छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कडवट विरोध केला. मराठ्यांचं स्वराज्य हिसकावण्यासाठी ज्या इर्षेनं औरंगजेब महाराष्ट्राच्या भूमीत आला ती ईर्षा महाराजांनी कधीच पूर्ण होऊ दिली नाही. औरंगजेबाची उभी हयात मराठ्यांविरोधात लढण्यात गेली. स्वराज्याच्या अस्तित्वासाठी मराठ्यांनी एकजुटीनं औरंगजेबाला झुंजवलं. इतकच नाही तर त्याची कबरही याच मातीत गाडली.  3 मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात  औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्याच इच्छेनुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरातच औरंगजेबाची कबर बांधली.

महाराष्ट्राचा मिनी ताज बीबी का मकबरा  

महाराष्ट्रातही आहे सेम टू सेम आग्रासारखा ताजमहल आहे. बीबी का मकबरा असे या वास्तूचे नाव आहे. औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या स्मरणार्थ बेगमपुरा परिसरात हा बीबी का मकबरा उभारण्यात आला आहे.इसवी सन 1679 मध्ये बीबी का मकबरा बांधण्यात आला. ही ऐतिहासिक वास्तू 345 वर्ष जुनी आहे. औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. बानो बेगमला जिथं दफन करण्यात आलं तिथेच  हा बीबी का मकबरा आहे. बानो बेगमला दफन केलेल्या ठिकाणी औरंगजेबाचा मुलगा आझमशाहने हा मकबर बांधला.बीबी का मकबरा  ही अतिशय सुंदर वास्तू आहे. दिल्लीतील ताजमहल प्रमाणेच याची रचना आहे. यामुळेच अनेक पर्यटक याला आवर्जून भेट देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *