एक महिला तिच्या बहिणीसोबत हरियाणातील कर्नाल येथील पंजाब नॅशनल बँकेत जाते. तिथं ती तिचं नाव मॅनेजरला सांगते आणि म्हणते, माझं लॉकर इथे आहे. पण ते ऐकून मॅनेजरला काय बोलावे हे समजत नाही. त्याचं झालं असं की, ज्या लॉकरबद्दल महिला विचारते त्या बँकेच्या लॉकरमधून अनेक तोळे सोने गायब झाले आहे. हे सोने आणि लॉकर कोणाकडे आहे, हे कोणाला माहीतच नाहीये. हरियाणातील कर्नालच्या पंजाब नॅशनल बँकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. तिचे सोने कोणाकडे आहे? असा प्रश्न पीडित महिलेने केला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
हरियाणातील कर्नालच्या पंजाब नॅशनल बँकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या लॉकरमधून अनेक तोळे सोने गायब झाले आहे. हे सोने आणि लॉकर कोणाकडे आहे, असा प्रश्न पीडित महिलेने केला आहे. लॉकर उघडले असता बरेचसे सोने गायब झालेले तिलाआढळले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने बँकेच्या लॉकरमध्ये सुमारे 30 ते 35 तोळे सोने ठेवले होते. घरी लग्न असल्याने ते घेण्यासाठी दोघी बहिणी आल्या होत्या. त्या तिघी बहिणी असून हे सोने बँकेत ठेवलेले तीन बहिणींचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. काय झाले हे त्यांना कळत नाहीये. मात्र, या प्रकरणाबाबत डायल 112 चे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली.
