बीडमधील घटना ही नैतिकतेची हत्या! पंकजा मुंडे यांचे परखड मतप्रदर्शन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, दोन समाजांमध्ये निर्माण झालेली तेढ, एका समाजाला करण्यात येणारे लक्ष्य यामुळे आपण अस्वस्थ असून बीडमधील या साऱ्या घटना म्हणजे नैतिकतेची हत्या असल्याचे परखड मत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी नोंदविले. सोमवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर मनमोकळे भाष्य केले.

सरपंच हत्या प्रकरण, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप, जातींमध्ये उफाळून आलेला संघर्ष, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील व आजचा भाजप अशा अनेक विषयांवर पंकजा मुंडे यांनी आपली मते मांडली. ‘‘देशमुख भाजपचे कार्यकर्ते आणि माझे मतदान केंद्रप्रमुख होते. त्यांचा बिचाऱ्यांचा जीव गेला, कुटुंबावर मोठा आघात झाला. त्यानंतर एका समाजाला किंवा जातीला गुन्हेगार ठरविले गेले. पण त्यातून काय साधायचे आहे? नांदेड, पुण्यातही हत्या झाली, पण त्यानंतर असे वातावरण तयार झाले नाही. ही एक नैतिकतेची लढाई आहे. सत्ता सहजपणे माज आणते व व्यक्तीला अहंकार देवून जाते. मी त्याला खतपाणी घालू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *