भारतातील सर्वात मोठे दिग्दर्शक म्हणून ओखळणारे एस शंकर यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने एस. शंकर यांच्या तीन संपत्त्या जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेम चेंजर, हिंदुस्तानी 2, रोबोट, शिवाजीसारख्या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर कथा चोरण्याचा आरोप होता. त्यात ते दोषी आढळले होते. ईडीने ही कारवाई करत मनी लाँड्रिग कायद्यांतर्गंत साहित्यिक चोरी आणि कॉपीराइट उल्लंघनच्या आरोपांवर केली आहे.
एका रिपोर्टनुसार, ईडीने केलेल्या एका वक्तव्यानुसार, 17 फेब्रुवारी रोजी पीएमएलएतंर्गंत एक प्रॉविजनल ऑर्डर जारी केली आहे. त्यात दिग्दर्शक एस शंकर यांच्या तीन अचल संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, देशात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साहित्यिक चोरी किंवा कॉपीराइट उल्लंघनच्या आधारे पीएमएलएच्या अंतर्गंत संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपत्तीची किंमत 10.11 कोटी रुपये इतके आहे. हे प्रकरण 2011 सालातील आहे. रजनीकांत-ऐश्वर्या राय बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या एंथिरन म्हणजेच रोबोट या चित्रपटासंदर्भातील हे प्रकरण आहे. एस शंकर यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचे प्रकरण 19 मे 2011च्या चेन्नईच्या एग्मोरच्या एका कोर्टात दाखल करण्यात आले होते. शंकर यांच्याविरोधात ‘जिगुबा’ कथेचे लेखक आरूड तामिलनाडन यांनी तक्रार दाखल करत त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला होता.
ईडीने म्हटलं आहे की, शंकर यांनी दिग्दर्शन केलेल्या तामिळ चित्रपट एंथिरनची कथा जिगुबातून कॉपी करण्यात आली आहे. यानंतर शंकर यांच्यावर कॉपीराइट अधिनियम 1957 आणि भारतीय दंड संहिताअंतर्गंत तक्रार दाखल करण्यात आली होती. एंथिरन 2010मध्ये प्रदर्शित झाली होता. यात रजनीकांत आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.
रोबोट नावाने या सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने 290 कोटींची कमाई केली होती. त्याकाळी हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. ईडीने तपासादरम्यान म्हटलं होतं की शंकर यांना 11.5 कोटींची फी मिळाली होती. ही फी त्यांनी कहानी डेव्हलपमेंट, स्क्रिप्ट, डायलॉग आणि दिग्दर्शनसाठी मिळाली होती.