भिवंडी हादरली! प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेयसीकडून संपत्तीसाठी 22 वर्षीय तरुणाची हत्या

उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी येथील ओला चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली असून त्याचं नावं अक्रम कुरेशी असं असून तो 22 वर्षांचा होता. प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी अक्रम कुरेशीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .याप्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

कसा घेतला शोध?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ, तानसा पाईप लाईन शेजारील रस्त्यावर 17 जानेवारी रोजी अक्रम इकबालुद्दीन कुरेशी (राहता जोगेश्वरी , मुंबई) हा ओला चालक गाडी भाडे घेऊन आला असता अज्ञाताने लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला.पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासा वरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *