चाकूने वार करून मित्राची हत्या

शेजारीच राहणाऱ्या मित्राने किरकोळ वादातून चाकूने वार करून ४१ वर्षीय व्यक्तीची निर्घूण हत्या केल्याची घटना अंधेरी पूर्व येथे घडली. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. आरोपीने हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. छातीवर डाव्या बाजूला चाकुमुळे गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सुजीत हरिवंश सिंह (४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सहार रोड परिसरात ते कुटुंबियांसोबत राहत होते. त्यांची पत्नी पूनम सुजित सिंह (३९) यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुनील परशुराम कोकाटे (५२) याला अटक केली. तक्रारीनुसार, सुजीत व सुनील दोघेही चांगले मित्र होते. सुजीत आणि सुनील शेजारी होते. पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या सुनीलने मालाधारी रहिवासी संघ येथील यशोधन सोसायटीच्या कार्यालयासमोर सुजीतला गाठले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *