महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक १ आणि २ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे झाली. या बैठकीसाठी राज्यभरातून १७ जिल्ह्यातून १२५ अंनिस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी देशपातळीवर जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी पाठपुरावा करणे, अंधश्रद्धा विषयी प्रबोधन अभियान राबवणे, आंतरजातीय-धर्मीय विवाह यासाठी वधू वर सूचक मंडळाचे काम सुरू करणे आदी ठराव मंजूर करण्यात आले. या वेळी सुहास विद्वांस, पर्यावरण अभ्यासक डॉ. केतन चौधरी, मुश्ताक खान यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस विनोद वायंगणकर, राहुल थोरात, राधा वणजू, वल्लभ वणजू, मधुसूदन तावडे, अतुल तांबट, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, सम्राट हटकर, दीपक गिरमे, गणेश चिंचोले डॉ. हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, रामभाऊ डोंगरे उपस्थित होते.