दुरुस्तीच्या कामानिमित्त रेल्वेच्या तीन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार व रविवारच्या मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
बोरिवली आणि भाईंदरदरम्यान अप जलद मार्गावर रात्री २३.३० ते पहाटे ३.३० तर डाऊन जलद मार्गावर रात्री १२.५५ ते पहाटे ४.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर अप धीम्या मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
तर मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीमदरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
