स्वाईन फ्लूचा राज्यभर प्रकोप

स्वाईन फ्लूचा राज्यभर प्रकोप

स्वाईन फ्लूने राज्यात तीन दिवसांत २० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात स्वाईन फ्लूने दगावलेल्यांचा आकडा ७६५ वर गेला आहे.

२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान २४,१६३ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी ७२४ जणांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. १२२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

६९ जण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. अवघ्या तीन दिवसांत पुण्यातील सात, नागपूर २, नाशिक २, अमरावती १, अहमदनगर २, कोल्हापूर १, गोंदिया १, सांगली १ व नांदेडमधील एकाचा मृत्यू झाला.

नागपूरमध्ये सर्वाधिक बळी
उपराजधानी नागपूरमध्ये स्वाईन फ्लूने सर्वाधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे स्वाईन फ्लूची साथ मोठय़ा प्रमाणात आहे. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक ७३ जणांचा बळी गेला आहे. तर मुंबईत ६७ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुणे ६२, नाशिक ६१, ठाणे ४५ व अहमदनगरमध्ये ३५ जणांना जीव गमवावा लागला आहे.

पुण्यात ६२ जणांचा मृत्यू
जानेवारीपासून आत्तापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या ८,०४८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यापैकी ६,९६९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर अन्य १,०७९ जणांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *