“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!

ब्लॅकमेलिंग करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या एका व्यक्तीचा महिलेने खून केला आहे. शारीरिक संबंध ठेवत असतानाच ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. इक्बाल असं त्याचं नाव आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

महिलेने पोलिसांना सांगितले की, इक्बाल हा जरी जरदोजी कामगार होता. तो तिच्या गावात घरोघरी जात असे. यातून महिलेची आणि याची ओळख झाली. ओळखीतून त्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक शेअर केले. मोबाईल नंबर शेअर झाल्यावर ते सातत्याने एकमेकांशी बोलू लागले. एके दिवशी इक्बालने तिला त्याच्या घरी भेटायला बोलावले. यावेळी त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला नकार देताच त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आपल्या दोघांचे कॉल रेकॉर्डिंग मी तुझ्या नवऱ्याला पाठवेन अशी धमकी देत त्याने तिच्याशी जवळीक साधली. याच ब्लॅकमेलचा कंटाळा आल्याने महिलेने त्याची हत्या केली.

कशी केली हत्या

“मला लहान मुले आहेत म्हणून मी सुरुवातीला ब्लॅकमेल सहन केले. माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने मला खूपवेळा ब्लॅकमेल केले. यामुळे मी कंटाळले होते. बुधवारी इक्बालने त्याच्या बायकोला तिच्या माहेरी सोडलं. त्यामुळे त्याने मला त्याच्या घरी बोलावून घेतलं. त्याने माझ्या पतीला झोपण्यासाठी दोन गोळ्या दिल्या होत्या. रात्री ८ च्या सुमारास मी माझ्या पतीला चहातून त्या गोळ्या देऊ केल्या. काही वेळातच तो झोपी गेला. रात्री ११.४० च्या सुमारास मी इक्बालशी फओनवर बोलत असताना त्याने मला त्याच्या घरी बोलावलं”, असं महिलेने पोलीस जबाबात नोंदवलं आहे.

इक्बालच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळल्याचे महिला पुढे म्हणाले, “त्याच्या घरी जाताना मला वाटले की एकतर स्वतःचा जीव घ्यावा किंवा त्याचा जीव घ्या. जेव्हा तो माझ्याशी जवळीक साधू लागला तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत होतो. मी त्याचे हात अलगद धरून त्याच्या छातीवर बसले. मग मी एक हात त्याच्या तोंडावर ठेवला. त्यातच त्याचं तोंड दाबून त्याचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला. तो मेला असल्याची खात्री झाल्यावर मी त्याचा मृतदेह खेच पायऱ्यांजव आणला. मला माझं कुटुंब सुरक्षित करायचं होतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *