‘मुस्लिम महिलांनी निवडणूक लढवू नये’, कोल्हापुरात मुस्लिम संघटनेचा अजब फतवा

‘मुस्लिम महिलांनी निवडणूक लढवू नये’, कोल्हापुरात मुस्लिम संघटनेचा अजब फतवा

महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच कोल्हापुरात मुस्लिम महिलांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापुरातल्या मसलिज-शुरा-उलेमा-ए-कोल्हापूर या मुस्लिम संघटनेनं हा फतवा काढला आहे.

या फतव्याचं पत्रक नमाज पठणासाठी येणाऱ्या प्रत्येक मुस्लिमांना देण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांना उमेदवारीच देऊ नका म्हणून राजकीय पक्षांनाही विनंती केल्याचीही माहिती मिळते आहे. मुस्लिम महिलांनी निवडणूक लढवणे म्हणजे मुस्लिम धर्माच्या विरोधात असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. मात्र, या फतव्यावर कुठलाही शिक्का किंवा सही नाहीए.

या फतव्याची कोल्हापुरात आणि माध्यमांतून चर्चा सुरु झाल्यानंतर हा फतवा कुणी वाटला या बद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. कोल्हापूर महापालिका निवडणुकीचं 1 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

कोल्हापूर महापालिका सभागृहात याआधी तीन ते चार मुस्लिम महिलांनी प्रतिनिधीत्व केले आहे. पण निवडणूक लढवणाऱ्या महिलांची संख्या कमी होती. यंदा ती वाढणार आहे. पुरोगामी कोल्हापुरातच असा फतवा प्रथमच निघाला आहे. या पार्श्वभूमीवर निघालेल्या या फतव्याबाबत प्रमुख राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *