भाजीच्या आडून शस्त्रांचा व्यापार, मुंबईत भाजी विकणारी महिला अटकेत

भाजीच्या आडून शस्त्रांचा व्यापार, मुंबईत भाजी विकणारी महिला अटकेत

मुंबईत एका भाजी विकणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. भाजीच्या आडून अवैध शस्त्रांची तस्करी आणि विकण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही महिला शस्त्र विकण्यासोबतच भाड्यानेही देत होती.

प्रमिला नाडार असं या महिलेचं नाव आहे. ती अनेक वर्षांपासून जोगेश्वरी परिसरात भाजीचा गाडा लावत आहे. पण खरंतर ती भाजीच्या आडून देशी शस्त्रांच्या व्यापार करत असे. मुंबई पोलिसांनी प्रमिलाला देशी कट्टा आणि काडतूसांसह रंगेहाथ अटक केली आहे.

या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. प्रमिलाने देशी शस्त्रांसाठी स्वत:चं एक रेट कार्ड बनवलं होतं, ज्यावर देशी कट्ट्याची किंमत, गोळ्यांच्या दराची माहिती लिहिलेली होती. इतकंच नाही तर प्रमिला मुंबईतील अनेक छोट्या-मोठ्या गुन्हेगारांना, साखळी चोरांना देशी कट्टे दिवसाच्या भाड्यावर देत असे.

मुंबई पोलिस गेल्या काही दिवसांपासून प्रमिला नाडारच्या शोधात होते. पोलिस आता प्रमिलाची चौकशी करत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *