देशाला अहिंसेच्या मार्ग दाखवत स्वातंत्र्य मिळविण्यात मोलाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी गांधीजींना आदरांजली वाहिली.
राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवानी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिथे काही काळ ध्यानही केलं. दरम्यान, गांधीजींच्या जंयतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती असून, सोनिया गांधी यांनी शास्त्रींच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

