सध्या रब्बीच्या पेरणीची तयारी सुरु असताना माजलगाव मधल्या शेतकऱ्यांना मात्र खरिपाला दिले जाणारे पीक कर्ज बँक देत नसल्याने सामूहिक आत्महत्येची परवानगी प्रशासानाकडे मागण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे.
माजलगाव तालुक्यातील टाकरवन आणि किटटी आडगाव येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे मागच्या चार महिन्यांपासून पीक कर्जाची मागणी केली. मात्र, बँकेने अद्याप या शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केलेला नाही.
पीक कर्जाचे वाटप न झाल्याने 500 शेतकऱ्यांनी कालपासून माजलगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलनाची दखल न घेतल्याने आज शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येची मागणी केल्यानंतर तरी प्रशासन यांच्याकडे लक्ष देणार आहे का, असा प्रश्न आता विचारला जातो आहे.

