अमेरिकेच्या महाविद्यालयात गोळीबार; 9 ठार

अमेरिकेच्या महाविद्यालयात गोळीबार; 9 ठार

रोजबर्ग ओरेगनच्या एका कम्युनिटी महाविद्यालयात एका बंदुकधारी व्यक्तनं प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 9 जण मारले गेले तर 7 जण गंभीररित्या जखमी झालेत.

गव्हर्नर केट ब्रॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार करणारा व्यक्तीचं वय 20 वर्ष आहे. पोलिसांनी गोळीबारानं दिलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झालाय. स्थानिक वेळनेनुसार सकाळी 10.30 च्या (भारतीय वेळेनुसार रात्री 11 च्या सुमारास) सुमारास हा गोळीबार झाला.

या घटनेत जखमी झालेल्या एका महिलेच्या छातीत गोळी लागलीय. तिची परिस्थिती खूप नाजूक आहे.

डगलस काऊंटी अग्निशमन विभागानं ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, शूटर्सना ‘कोड 4’मध्ये पाहण्यात आलं होतं. घटनास्थळी तातडीन मदत उपलब्ध करून देण्यासाठी अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *