आम्ही कंडोम वापरतो, त्यात गैर काय? : सनातन

आम्ही कंडोम वापरतो, त्यात गैर काय? : सनातन

गोवा सरकारकडून कंडोमचा पुरवठा झाल्याचा आरोप सनातन संस्थेने मान्य केला आहे. आमच्या आश्रमात विवाहित साधक आहेत, ते त्या कंडोमचा वापर करतात, मग त्यात गैर काय? असा सवाल करत सनातन संस्थेने गोवा सरकारकडून कंडोम स्वीकारल्याचा आरोप मान्य केला आहे.

विवाहित साधक सरकारमान्य कंडोम वापरत असतील तर त्यात गैर काय? असा सवाल सनातन संस्थेने केला आहे.

जानेवारी 2008 ते नोव्हेंबर 2009 या काळात 2900 कंडोमचा पुरवठा गोव्याच्या आरोग्य विभागाने केल्याचा दावा सनातनविरोधी आंदोलनाचे नेते सौरभ लोटलीकर यांनी केला होता.

लोटलीकर यांनी सरकारी रुग्णालाच्या पत्राच्या आधारावर हा आरोप केला होता. सनातन संस्थेत ही साधना कसली असते?, आश्रमात एवढे कंडोम कशासाठी? असा सवाल करत त्यांनी सनातनच्या कार्यावर संशय व्यक्त केला होता. शिवाय, लोटलीकरांनी ही सर्व माहिती आणि लेखी पुरावे पोलिस स्टेशनमध्ये सादर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *