अमृत महोत्सवी वर्षात आनंदवनला आर्थिक मदतीची गरज

दिवंगत बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या परिश्रमतून उभे राहिलेले आनंदवन तथा महारोगी सेवा समिती अमृत महोत्सवी वर्षात आर्थिक अडचणीत सापडली आहे. संस्थेने यावर्षी ७५ वर्ष पूर्ण केली.  पाच वर्षापासून शासनाकडे संस्थेचे चार कोटी रुपये थकीत असल्याने संस्थेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.  संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी समाजातील दानशूरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

बाबा व साधनाताई यांनी बचतीचा व योग्य आर्थिक नियोजनाचा संस्कार संस्थेत रुजवला, त्यामुळे संस्थेचे सेवाकार्य गेली ७५ वर्षे सुरळीतपणे पार पडू शकले. परंतु, गत काही वर्षांत जागतिक पातळीवर घडलेल्या घटनांचा  “संस्थात्मक पातळीवर”ही परिणाम झाला आहे.संस्थेच्या ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित १ हजार ५१७  कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार,वृद्ध-अनाथ-परित्यक्ता-मानसिकदृष्ट्या अपंग बांधव आणि त्यांची मुले, विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील निवासी ३०४ दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी यांचे रोजचे दोन वेळचे जेवण, चहा, न्याहारी, आरोग्यसेवा, निवाससुविधा, वीजबिल, , शैक्षणिक मदत,   या ठळक आणि इतर अनेक  गोष्टींचे नियोजन संस्थेमार्फत करण्यात येते.  त्याचबरोबर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य आणि कृषी महाविद्यालये, अनिवासी माध्यमिक शाळा, कृषी-तंत्र विद्यालय यांतील ३ हजार ५६५ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक खर्चाचा मोठा भार संस्थेला उचलावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *