नाशिक पेठ महामार्गावर असलेल्या सावळघाट येथे काल मंगळवारी रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सावळघाटात एका इको कारवर मागून आलेली ट्रॅक धडकली आणि पुढे असलेल्या ट्रॅक आणि मागून धडकलेल्या ट्रक यांच्यामध्ये ही इको कार दाबली गेली. या इको कारमध्ये बसलेल्या चार जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारुती ओमनी इको क्र. GJ 15 CR 5659 ही गाडी नाशिकहून पेठच्या दिशेने जात होती. याचवेळी सावळाघाट येथे तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्र. MH 04 GF 8901चे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ही या ट्रकवरील वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही ट्रक इको कारवर जाऊन धडकली आणि पुढे असलेल्या ट्रक क्र. NL 01 AC 1929 यांच्यामध्ये ही इको कार दाबली गेली. या अपघात इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
इको कारमध्ये बसलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेत गंभीर जखमी असलेल्या दोघा जणांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान एकाच मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण चौघांचा मृत्यू झाला. अपघातात मयत पावलेल्या आणि जखमी यांची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. तातडीने घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
भीषण अपघात चौघांचा मृत्यू दोन जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे अपघातांचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरी आज बुधवारी रोजी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभे करण्यात येत असलेल्या मोठी मालवाहू कंटेनर यांच्यामुळेच हे भीषण अपघात घडत आहेत. या अपघातात तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांना लांजा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. धडकेची तीव्रता इतकी भीषण की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
