चाळीशीतील लोकांना अचानक हार्ट अटॅक का येतो? कारण काय?

देशातील लोकप्रिय योगर्ट ब्रँड्समधील एक Epigamia चे को-फाऊंडर रोहन मीरचंदानी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. वयाच्या 41 व्या वर्षी मीरचंदानी यांनी 21 डिसेंबर रोजी शेवटचा श्वास घेतला. इतक्या कमी वयात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या वयाच्या चाळीशीत हृदयविकाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात जावण्याचे कारण काय? वयाच्या या अशा मधल्या टप्प्यावर नेमकं काय बिघडतं? अशा कोणत्या गोष्टीत आहे ज्याबाबत चाळीशीतील लोक गाफिल राहतात?

संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार; प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण 40 वर्षांच्या वयाचा आहे ज्या हार्ट अटॅक येतं. काही वर्षांपूर्वी 40 वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका येणे अत्यंत दुर्मिळ मानले जात होते, परंतु आता त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजच बातम्या येतात की, जिमला जाताना कुणालातरी हृदयविकाराचा झटका येतो आणि अनेकवेळा असे घडते की, त्या व्यक्तीला रुग्णालयात जायलाही वेळ मिळत नाही आणि यामागे काय कारण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *