हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे

उडुपी येथून टायर फुटल्याने थरारक अपघाताचा अंगावर काटा उभा करणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, जे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या पंक्चरच्या दुकानात एक मेकॅनिक बसचे टायर तपासताना आणि दुरुस्ती करताना दिसत आहे. टायरमध्ये हवा भरत असताना अचानक तो फुटतो.

हवा भरताना टायर फुटल्याने एक माणूस हवेत फेकला गेला

हा व्हिडीओ १३ सेकंदाचा आहे, ज्यामध्ये दुकानासमोर स्कूल बस उभी असल्याचे दिसत आहे. एक तरुण बसचा टायर दुरुस्त करून त्यात हवा भरत आहे. हवा भरल्यानंतर तो तिथून दूर जाऊ लागताच टायर फुटतो. हा स्फोट इतका शक्तिशाली आहे की, धुराच्या ढगाबरोबरच ती व्यक्ती काही इंच हवेत फेकली जाते आणि जोरात जमिनीवर कोसळते. आवाज ऐकून लोक त्याच्या मदतीला धावतात आणि त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जातात. या अपघातात मेकॅनिकच्या हाताला दुखापत झाली आहे.​​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *