पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘छत्रा जिल्ह्यातील सुरदा जंगलामध्ये खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुकून घांसी (वय 65) हा वृद्ध गेल्या काही महिन्यांपासून पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग करीत होता. त्याच्या छळाला मुलगी कंटाळली होती. तिने बुधवारी (ता. 30) सायंकाळी जंगलामध्ये घांसीचा खून केला. जंगलातून बाहेर आल्यानंतर याबाबतची माहिती तिने गावकऱ्यांना दिली होती. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीला अटक करण्यात आली आहे.‘
‘मुलगी व तिच्या मित्राला नको त्या अवस्थेत तुकून यांनी पाहिले होते. तुकून हे आपली बदनामी करतील या भीतीने तुकून यांचा खून केला,‘ असे घांसीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
पोलिस अधिकारी पेटेर किंडो यांनी सांगितले की, ‘वृद्धाच्या छळाला कंटाळल्याने मुलीने त्याची हत्या केली. दोघेही एकाच गावात राहात होते. वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.‘
