लोणावळ्यात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ, महिलांमध्ये घबराट

लोणावळ्यात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात दागिने चोरुन नेण्याच्या तीन घटना घडल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे.

लोणावळ्यातील रायवूड पार्क, भांगरवाडी, वळवण भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेले. वळवण-बापदेव रस्त्यावर महिलेच्य गळ्यातील दागिने चोरणारा चोरटा सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाला आहे. वळवण परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने चोरुन चोरटे दुचाकीवरुन पसार झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन दिवसात दागिने चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. दागिने चोरीच्या घटनांमुळे सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी लोणावळ्यात दुकानात शिरुन चोरट्यांनी महिलेचे दागिने चोरून नेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *